बद्दल

ट्रबल डिझायर हे एक इंटरनेट-आधारित स्वयं व्यवस्थापन करण्याचे साधन आहे. हे अशा लोकांसाठी आहे ज्यांना लहान मुलेमुली आणि नुकत्याच वयात येणाऱ्या मुलांमुलींविषयी लैंगिक आकर्षण वाटते. जेव्हा योग्य आणि शक्य असेल तेव्हा, एखाद्या चिकित्सकाशी संपर्क साधून देता येऊ शकेल. या मागे अंतिम उद्देश बाल लैंगिक अत्याचार आणि बाल शोषणाच्या प्रतिमांचा वापर याचा प्रतिबंध करणे हा आहे आणि पीडोफिलिया मुळे ज्यांना मानसिक क्लेश होत आहेत त्याना मदत करणे हा आहे.
व्यक्तीनुरूप विविध प्रकारची लैंगिक प्राधान्ये हे मानवी लैंगिकतेचे वैशिष्ट्य आहे. प्रत्येक व्यक्तीच्या लैंगिक आवडी-निवडींमध्ये वेगळेपणा असतो. या कल्पना प्रथम मनात घोळण्याच्या रूपात अवतरतात, आणि नंतर त्याप्रमाणे वागून बघण्याचा आवेग उत्पन्न होतो. कोणत्याही प्रकारची लैंगिक प्राधान्ये ही आधीच ठरलेली असतात आणि त्यात निवडीला वाव नसतो; आपली स्वत:ची लैंगिक ओढ कोणीही निवडून ठरवू शकत नाही.
विशिष्ट कामुक उत्तेजनांच्या (वरचेवर अनुभवलेल्या) आकृतीबंधांमधून वयात येण्याआधीची लहान मुले आणि/किंवा नुकत्याच वयात आलेल्या मुला-मुलींच्या शरीरयष्टीकडे प्राधान्याने लैंगिक आकर्षण निर्माण होते. जर्मनीतील अहवालानुसार साधारणतः एकूण पुरुष लोकसंख्येच्या एक टक्का माणसांना अशा प्रकारची लैंगिक आवड असते, ज्याला जागतिक आरोग्य संघटने पीडोफिलिया असे नाव दिले आहे. जोपर्यंत मुलांबद्दलची लैंगिक आवड काल्पनिक पातळीवरच मर्यादित राहते तोपर्यंत कोणाचेही कोणतेही नुकसान होत नाही. मात्र, जर मनातील अशा कल्पनांप्रमाणे हातून कृत्य घडले तर ते मुलांसाठी खूप नुकसानकारक ठरू शकते.
समाजात निषिद्ध मानलेले असल्याने पीडोफिलिया असणाऱ्या माणसाला व्यक्तिगत पातळीवर गंभीर क्लेश होऊ शकतात. यामुळे निराशा, चिंता आणि सामाजिक एकाकीपणा ह्यांच्याशी निगडित लक्षणे त्याच्यामध्ये दिसू शकतात, ज्यामुळे उलट प्रत्यक्षात आवेगांप्रमाणे कृती करण्याची शक्यता वाढू शकते, म्हणजेच त्यांच्या हातून मुलांचे लैगिक शोषण होण्याची किंवा बाल लैंगिक चित्रफितींचा वापर करण्याची (चाईल्ड पोर्नोग्राफी) शक्यता वाढते. आणि समस्याप्रधान लैंगिक वर्तणूकिला चालना मिळते.
बाल लैंगिक शोषणाचे अपराध कधीही घडायला नकोत, आणि हे दुखणे असलेल्या माणसाच्या आवेगांचे प्रत्यक्ष समस्याप्रधान लैंगिक वर्तनात रूपांतर होऊ नये, हे महत्वाचे आहे. स्वतःच्या क्लेशाबरोबर / मानसिक त्रासाबरोबर येणाऱ्या इतर लक्षणांचा सामना करण्यासाठी उपचारांच्या वेगवेगळया योजना उपलब्ध आहेत ज्यांच्यामुळे स्वतःच्या लैंगिक आवडीवर कृती न करता ती आपल्या व्यक्तिमत्वात संपादली जाऊ शकते.
ह्या भूमिकेतूनच पीडोफिलियाकडे कल असणाऱ्या माणसांना दिली जाणारी प्रतिबंधात्मक मदत ही जर्मन सरकारने साधारण आरोग्यसेवेमध्ये समाविष्ट करून घेतली आहे. विनामूल्य आणि गोपनीय असे प्रतिबंधात्मक उपचार घेता येणे, हा जर्मनीतील प्रत्येक माणसाचा हक्क आहे.
जर्मनीत हे उपचार गोपनीयता सांभाळून केले जाऊ शकतात कारण पीडोफिलियाकडे कल असणाऱ्या माणसांना, इतकेच नाही तर ज्यांच्या हातून आधीच गुन्हासुद्धा घडलेला असेल त्यांनाही हे उपचार कायदेशीर परिणामांना सामोरे न जाता घेता येतात (डॉक्टर-पेशंट गोपनीयता). भारत, कॅनडा किंवा युनायटेड स्टेट्स अशासारख्या इतर अनेक देशांमध्ये बाल-लैंगिक शोषणाच्या घटना पोलिसांना कळवणे बंधनकारक असलेले कायदे आहेत, त्यामुळे वैयक्तिक पातळीवर अशा पेशंट्स बरोबर इतर पेशंट्स सारखे खुलेपणाने काम करता येत नाही.
बाल-लैंगिक शोषण रोखणे हा एक सगळ्याच देशांशी संबंधित असलेला प्रश्न हाताळण्याचा आपण प्रयत्न करतो आहोत. हे स्व-व्यवस्थापन साधन मुलांच्या संरक्षणासाठी जसे बनवण्यात आले आहे, तसेच मुलांकडे लैंगिक आकर्षण वाटणाऱ्या माणसांच्या आयुष्याची गुणवत्ता सुधारण्यासाठीही बनवण्यात आलेली आहे कारण खबर करण्याविषयी बंधनकारक कायदे असलेल्या देशातील लोक मानसिक-वैद्यकीय मदत मिळवू शकत नाहीत. ही सेवा निनावी, गोपनीय, विनामूल्य आणि कोणत्याही हितसंबंधांपासून मुक्त अशी आहे. ट्रबल्ड डिझायर ह्या साधनाचा उद्देश सर्वत्र मुलांच्या सुरक्षेस हातभार लावण्याचा आहे, तसेच पीडोफिलियाकडे कल असणाऱ्या, पण लैंगिक गुन्हे सोडून देऊन निरोगी आणि समाधानकारक जीवन ज्यांना जगायचे आहे, त्यांनाही तसे करण्यात मदत करायचा आहे.
जर तुम्ही मुलांसाठी लैंगिक प्राधान्य असलेल्या लोकांना मदत करण्यास इच्छुक असे आरोग्यसेवा व्यावसायिक असाल, तर कृपया आमच्याशी संपर्क साधा (info@troubled-desire.com)