ट्रबल्ड डिझायरचे गोपनीयतेबाबतचे धोरण

शॅरीते विद्यापीठातील इन्स्टिट्यूट ऑफ सेक्सोलोजी अँड सेक्शुअल मेडिसिनद्वारे troubled-desire.com ही वेबसाईट चालविली जाते आणि त्यामार्फत तपासणी आणि उपचार अशा प्रकारची सेवा पुरविली जाते.

तुमची वैयक्तिक माहिती आम्ही खूप काळजी घेऊन सुरक्षित ठेवतो आणि माहिती संरक्षण कायद्याचे आम्ही कटाक्षाने पालन करतो. याठिकाणी तुमची वैयक्तिक माहिती तांत्रिकदृष्ट्या जेवढी गरजेची आहे तेवढीच विचारलेली आहे. कोणत्याही परिस्थितीत ही माहिती बाहेर कोणालाही सांगितली जाणार नाही किंवा विकली जाणार नाही. ह्याच नियमांचे पालन करण्यास आम्ही कोणत्याही बाह्य सेवा पुरवणाऱ्यानांही भाग पाडतो.

कृपया लक्षात ठेवा की इंटरनेटवर माहिती प्रसारित करण्यामध्ये (उदा. ई-मेल द्वारे संभाषण करताना) पण सुरक्षिततेच्या बाबतीत धोके निर्माण होऊ शकतात. तिऱ्हाईत माणसांकडून अनधिकृतरीत्या माहिती मिळवली जाणे हे सहसा माहितीला पूर्ण संरक्षण देता न येण्यामागचे तांत्रिक कारण असू शकते. तुमच्या माहितीचे सर्वोत्तम पद्धतीने रक्षण करण्याचा आम्ही सर्वंकष प्रयत्न करतो.

माहिती घेत असताना तुमच्या माहितीच्या रक्षणाची हमी आम्ही कशी देतो, आणि कोणत्या कारणासाठी नेमकी कुठल्या प्रकारची माहिती घेतली जाते, याविषयीची माहिती पुढील निवेदनात नमूद केली आहे.

वैयक्तिक ओळख निर्देशित करणारी माहिती

वैयक्तिक ओळख स्पष्ट करणारी माहिती म्हणजे विशिष्ट किंवा ओळखता येण्याजोग्या व्यक्तीचे व्यक्तिगत आणि वास्तविक परिस्थितीचे तपशील. यामध्ये तुमचे नाव, पत्ता, फोन नंबर अशा माहितीचा समावेश होतो. जी माहिती तुमच्याशी संबंधित नाही (उदा., या वेबसाईटला किती लोकांनी भेट दिली) अशा माहितीचा इथं समावेश करण्यात आलेला नाही. कृपया हे लक्षात असू द्या की, अपवादात्मक परिस्थितीत ओळखता न येण्याजोगे पण एकमेव आणि अद्वितीय वैयक्तिक माहितीचे तपशील एकत्र आले असता, ते तुमच्या ओळखीशी जोडले जाऊ शकतात.

तुमची ओळख उघड न करता तुम्ही आमच्या ऑनलाईन सेवेचा लाभ घेऊ शकता.

वेबसाईटवरील माहितीवरील प्रक्रिया

सेवाप्रदान करताना सर्व्हर लॉग फाईल्स जतन करत नाही, म्हणजे आपल्या ब्राउझरवरून पाठविलेली माहिती जतन केली जात नाही. IP address केवळ भौगोलिक-स्थान निश्चितीसाठी वापरले जातात.

Troubled Desire (ट्रबल्ड डिझायर) च्या आशय व्यवस्थापनासाठी, आम्ही वेब सीएमएस काँटाओ (web CMS Contao) ("Accessible Open Source Content Management System - Contao Open Source CMS," n.d.) चा वापर करतो. यामध्ये खालील प्रकारच्या पानांचा समावेश होतो: मुख्य पान, मजकूर असलेले साधे पान, प्रतिमा, व्हिडीओ, आणि ऑडीओ मजकूर/माहिती आणि प्रत्यक्ष क्लिनिकल कामात किंवा संशोधनासाठी लैंगिक प्राधान्य आणि समस्याग्रस्त लैंगिक वर्तन याबाबत वैयक्तिक अभिप्राय देण्यासाठीचा ऑनलाईन सर्व्हे. वैयक्तिक ओळख सांगता येणारी माहिती या कारणासाठी संकलित केली जात नाही.

जर वापरकर्त्याने नवीन सत्र सुरू केले तर ते सत्र कुठल्याही नियमाला न अनुसरता निर्माण केलेल्या गुप्त अशा "पिन" (PIN) ला जोडून संग्रहित केले जाते. हा पिन वापरकर्त्याला कोणत्याही वेळेला पाहता येतो आणि स्वतः पूर्वी भरलेली माहिती पुन्हा उपलब्ध करून देतो. ऑनलाईन सर्वेक्षणात दिलेल्या प्रश्नांच्या उत्तराव्यतिरिक्त प्रत्येक पिन साठी खालील माहिती संग्रहित केली जाते: आय पी अॅड्रेस वरून ठरवलेला वापरकर्त्याचा देश (आय पी अॅड्रेस संग्रहित केला जाणार नाही), तसेच ऑनलाईन सर्वेक्षणाची प्रगती आणि प्रथम प्रवेशाची तारीख आणि वेळ, मागील भेटीच्या वेळेस केलेले बदलाची तारीख आणि वेळ तसेच ऑनलाईन सर्वेचा सेशन आय.डी. हे सर्व तीन महिने वापरले गेले नाही तर आपोआप पुसून (डिलीट करून) टाकले जाईल.

माहितीवरील प्रक्रियेचा कायदेशीर आधार हा Article 6, § 1, P.1 lit. f. GDPR (अनुच्छेद ६, आणि १,पी.१लि.एफ.जीडीपीआर) आहे. सेवा पुरवणाऱ्याचा माहिती गोळा करण्यामागे सनदशीर हेतू काय आहे, हे वर माहितीवरील प्रक्रिया या विभागात नमूद केले आहे. गोळा केलेल्या माहितीचा उद्देश तुम्ही व्यक्ती म्हणून कसे आहात हा निष्कर्ष काढण्यासाठी कधीही केला जाणार नाही. अर्थात, सेवा पुरवणाऱ्याला ह्या माहितीतून कुठल्याही प्रकारे विशिष्ट वापरकर्त्याशी/व्यक्तीशी संपर्क करता येणार नाही.

शॅरिते-युनिव्हर्सिटीमेडीझीन बर्लिन येथील सेक्सोलॉजी आणि सेक्सुअल मेडिसीन संस्था आणि इकोना मीडियाचे अधिकृत कर्मचारी ह्यांनाच वेब-सीएमएस काँटाओद्वारे गोळा केलेली माहिती हाताळण्याचा अधिकार आहे. ईकोना मीडिया जीएमबीएच आणि इकोना सिस्टम्स जीएमबीएचचे जबाबदार कर्मचारी सदस्यदेखील डेटाबेससह वेबसर्व्हर हाताळू शकतात.

 

कुकीज

या वेबसाईटवर वेगवेगळ्या ठिकाणी कुकीजचा वापर केलेला आहे. त्यामुळे ही साईट बघणे (म्हणजेच पर्यायाने, देऊ केलेली उपचाराची संधी) जास्त सोपे, परिणामकारक आणि सुरक्षित होईल. कुकीज म्हणजे छोट्या टेक्स्ट-फाईल्स ज्या तुमच्या संगणकावर आणि तुमच्या ब्राउझरने साठविलेल्या असतात. एकदा तुम्ही ब्राउझर बंद केलात किंवा तुमची या साईटला भेट देऊन पूर्ण झाली कि त्या आपोआप पुसून टाकल्या (डिलीट केल्या) जातील. कुकीजमुळे तुमच्या संगणकाला कोणताही धोका नाही आणि यामध्ये कुठलेही वायरस नसतात.

तुम्ही दिलेली माहिती, दुरुस्ती, माहिती काढून टाकणे किंवा ब्लॉक करणे याबाबतचे तुमचे अधिकार

तुम्हाला कोणत्याही वेळेस तुम्ही दिलेली माहिती जाणून घेण्याचा, ती दुरुस्त करण्याचा, डिलीट करण्याचा अथवा ब्लॉक करण्याचा अधिकार आहे. कृपया यासंदर्भात जरूर वाटल्यास शॅरीटे विद्यापीठातील इन्स्टिट्यूट ऑफ सेक्सॉलॉजी अँड सेक्शुअल मेडिसिन येथे प्रा. डॉ. डॉ. क्लाउस एम. बैअर यांच्याशी संपर्क करा. <sexualmedizin@charite.de>#

कोणत्याही वेळी जबाबदार नियामक प्राधिकरणाकडे तक्रार दाखल करण्याचा तुम्हाला हक्क आहे. तुमचे निवासस्थान, कामाचे ठिकाण किंवा जेथे कथित उल्लंघन झाल्याचा दावा आहे, अशा ठिकाणाशी सुसंगत असे जबाबदार प्राधिकरण असेल. नियामक एजन्सींची सूची (नॉन-पब्लिक रिअल्मसाठी) इत्यादिंचे पत्ते उपलब्ध आहेत. https://www.bfdi.bund.de/DE/Infothek/Anschriften_Links/anschriften_links-node.html.

बालकांसाठी माहितीची गोपनीयता

आम्ही देत असलेल्या ह्या आमच्या सेवा १४ वर्षाखालील मुलांसाठी नाहीत. आम्ही माहिती असताना / जाणूनबुजून १४ वर्षाखालील बालकांकडून त्यांची ओळख दर्शविणारी माहिती घेत नाही आणि पुढे पाठवतही नाही. जर आम्हांस असे आढळले की एखाद्या १४ वर्षाखालील बालकाने त्याची वैयक्तिक माहिती दिलेली आहे तर आम्ही लगेचच ती डिलीट/नष्ट करून टाकतो. जर तुम्ही आई-वडील किंवा पालक असाल आणि तुम्हाला हे जाणवले की तुमच्या पाल्याने त्याची वैयक्तिक माहिती इथं दिलेली आहे तर कृपया आम्हाला संपर्क करा जेणेकरून आपण आवश्यक ती काळजी घेऊ शकू.

इतर साईट बरोबर लिंक

आमच्या सेवेमध्ये इतर वेबसाईटच्या लिंक असण्याची शक्यता आहे. जर तुम्ही त्या लिंकवर गेलात तर त्यांच्या साईटला भेट देऊ शकाल. हे लक्षात घ्या की या बाह्य साईट आम्ही चालवीत नाही. जर तुम्ही या लिंकवर गेला नाहीत तर तुमची माहिती ते गोळा करू शकणार नाहीत. म्हणून, आम्ही तुम्हाला आवर्जून असा सल्ला देतो की ह्या इतर वेबसाईटचे गोपनीयतेबाबतचे जे धोरण आहे, ते पुन्हा एकदा समजून घ्या. इतर वेबसाईटद्वारे मिळालेली माहिती, त्यांचे धोरण, किंवा त्यांच्या पद्धती, यांवर आमचे कोणतेही नियंत्रण नाही आणि आम्ही त्यावरील आशयाची जबाबदारी घेत नाही.

या गोपनीयतेच्या धोरणांमध्ये बदल

वेळोवेळी विकसित होणारे तंत्रज्ञान आणि सध्याच्या कायदेविषयक तरतुदींमध्ये बदल यामुळे आमच्या गोपनीयतेविषयक धोरणात योग्य ते बदल करत राहण्याची गरज पडू शकते आणि आमची धोरणे सुधारण्याचा हक्क आम्ही राखून ठेवतो. म्हणून, आम्ही तुम्हाला सल्ला देतो की वेळोवेळी तुम्ही आमच्या या पानाला भेट देऊन बदलांची नोंद घ्यावी.

माहिती गोळा करण्याची आणि वापराची जबाबदारी

 

शॅरीटे विद्यापीठातील इन्स्टिट्यूट ऑफ सेक्सॉलॉजी अँड सेक्शुअल मेडिसिन, बर्लिन

सेंटर फॉर ह्युमन अँड हेल्थसायन्सेस

इन्स्टिट्यूट ऑफसेक्सोलोजी अँड सेक्शुअल मेडिसिन

लुइजिनत्रबे ५७

१०११७ बर्लिन

t: +49 30 450 529 302

 

sexualmedizin@charite.de  

 

आमच्या माहिती सुरक्षा व्यवस्थापकाशी संपर्क साधा 

 

शॅरीते विद्यापीठ, बर्लिन 

माहिती सुरक्षा कर्मचारी  

शॅरीटे मित्ते कॅम्पस  

शॅरीटे प्लाझ १ 

१०११७ बर्लिन 

 

आमच्या गोपनीयतेच्या धोरणांसंदर्भात तुम्हाला काही प्रश्न किंवा सूचना असतील तर आमच्याशी संपर्क साधण्यास संकोच करू नका.

सुधारित आवृत्ती १३ डिसेंबर २०१८

अधिक माहिती

तुम्ही तुमची वैयक्तिक माहिती आम्हाला देऊन आमच्यावर जो विश्वास दाखविला आहे त्याचे आम्हाला खूप महत्व वाटते. म्हणून आम्ही तुमच्या वैयक्तिक माहितीवरील प्रक्रियेबाबत तुम्हाला काही प्रश्न असल्यास त्यांची उत्तरे देऊन तुमच्या वैयक्तिक माहितीचे संरक्षण करण्याचा आटोकाट प्रयत्न करतो. तुमचे काही प्रश्न गोपनीयता धोरण वाचल्यानंतरदेखील अनुत्तरित राहिले किंवा तुम्हाला कोणत्याही विशिष्ट समस्येवर अधिक तपशील हवे असल्यास, कृपया माहिती सुरक्षितता रजिस्ट्रारशी संपर्क साधण्यास संकोच करू नका.  sexualmedizin@charite.de.