तुम्हाला मुलांबद्दल लैंगिक आकर्षण वाटते का?

येथे गोपनीय मदत उपलब्ध आहे.

ज्या लोकांना मुलां-मुलिंबद्दल आणि नुकत्याच वयात येत असलेल्या पौगंडावस्थेतील मुलांमुलिंबद्दल लैंगिक आकर्षण वाटते आणि ज्यांना प्रत्यक्ष तज्ञांचे मार्गदर्शन घेण्याची संधी उपलब्ध नाही, अशा लोकांसाठी TROUBLED DESIRE (ट्रबल्ड डिझायर - क्लेशकारक इच्छा) ही ऑनलाईन-सेल्फ-मॅनेजमेंट (इंटरनेटवरून स्व-व्यवस्थापन) देऊ करते.

तुमची नेमकी चिंता काय आहे?

बहुतेक करून मी स्वत:हून मुलांकडे आकर्षित होतो.

माझ्या माहितीतली एक व्यक्ती आहे, जिला बहुतेक करून मुलांबद्दल लैंगिक आकर्षण वाटते.

मी आरोग्य सेवा क्षेत्रात काम करतो/ते, आणि मला काही माहिती घ्यायला आवडेल.

जर तुम्ही आरोग्य सेवा क्षेत्रात कार्यरत असाल आणि तुम्हाला मुलांविषयी लैंगिक आकर्षण प्राधान्याने असणाऱ्या माणसांना (उपचाराच्या दृष्टीने) मदत करण्याची इच्छा असेल, तर कृपया मोकळ्या मनाने आमच्याशी संपर्क साधा. info@troubled-desire.com

ऑनलाईन स्व-व्यवस्थापन

सत्राचा आढावा

माझ्या स्वतःविषयी माहिती

आम्ही तुम्हाला तुमचे शिक्षण, कुटुंब, व्यवसाय आणि तुमचा मुला-मुलीं बरोबर संपर्क आणणाऱ्या परिस्थिती, ह्या विषयी काही प्रश्न विचारणार आहोत. कृपया सर्व प्रश्नांची उत्तरे पूर्णपणे द्या, म्हणजे आम्हाला आमच्या पद्धती प्रत्येकाला योग्य आणि अनुकूल अशा करता येतील आणि तुम्हाला वैयक्तिक आणि विधायक प्रतिसाद देता येईल.

मला वाटते (माझ्या भावना आणि विचार)

तुमच्या लैंगिक कल्पनाविश्वाबद्दल आम्ही काही प्रश्न विचारणार आहोत. लैंगिक कल्पना ह्या मोलाची माहिती देणारी एक गोष्ट आहे. कृपया सर्व प्रश्नाची उत्तरे पूर्णपणे द्या, म्हणजे आम्हाला आमच्या पद्धती प्रत्येकाला योग्य आणि अनुकूल अशा करता येतील आणि तुम्हाला वैयक्तिक आणि विधायक प्रतिसाद देता येईल.

माझ्या वागण्याच्या पद्धती

तुमच्या लैंगिक आणि इतर वर्तनाबद्दल आम्ही तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहोत. कृपया सर्व प्रश्नाची उत्तरे पूर्णपणे द्या, म्हणजे आम्हाला आमच्या पद्धती प्रत्येकाला योग्य आणि अनुकूल अशा करता येतील आणि तुम्हाला वैयक्तिक आणि विधायक प्रतिसाद देता येईल.

वैयक्तिक प्रतिसादात्मक अहवाल

आम्ही तुम्हाला तुमचे लैंगिक प्राधान्य आणि तुमच्या लैंगिक वर्तनातील अडचणींबद्दल वैयक्तिक अहवाल देऊ.

लैंगिक निवडीबाबतची जडण-घडण

आपण लैंगिक आवडीनिवडी किंवा प्राधान्यांच्या रचना आणि एकूणच लैंगिक जगतामधील इच्छा, कल्पना यांच्या रंगपटाचे विविध बारकावे जाणून घेणार आहोत; आणि त्यामध्ये तुमची प्राधान्ये आणि इच्छा कुठे येतात, ह्याविषयी पण यथार्थ जाणीव करून घेणार आहोत.

समस्यात्मक लैंगिक वर्तन

जेव्हा जेव्हा लैंगिक क्रियेमध्ये एकापेक्षा अधिक व्यक्तींचा सहभाग असतो तेव्हा ते लैंगिक वर्तन परस्पर सहमतीवर आधारित असणे आवश्यक आहे. आपण समस्याग्रस्त लैंगिक वर्तनाच्या संदर्भाने अशी संमती देणे अथवा घेणे या बाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

गैरसमजुतीपासून दूरच राहू

आम्ही प्रेमाबद्द्लच्या, लैंगिकतेबद्द्लच्या आणि लैंगिक शोषणाला सामोरे जाणाऱ्या मुलामुलींच्या अनुभवाबाबतच्या खऱ्या-खोट्या समजुती जाणून घेऊ आणि सत्य माहिती देऊन तुमच्या मनातील गैरसमजुती दूर करू.

जसा चष्मा लावावा तसा रंग बदलतो

जर एखाद्याने फक्त आवडेल तेच पाहायचे ठरवले, तर त्या माणसाला फक्त आनंद देणारेच पैलू दिसतील. आपण एका प्रसंगाच्या साहाय्याने हे जाणून घेणार आहोत कि प्रत्यक्ष अनुभवाचे अर्थ आपल्याला हवे तसे वळवण्याची क्षमता आपल्या विचारांमध्ये असते.

लैंगिक आकर्षणांची उत्पती

लैंगिक आकर्षणामागे नेमके कोणते कारण असते, असं कोणी विचारले तर वास्तविकत: त्यामागे अनेक कारणे असतात... आपण विविध लैंगिक पसंतीच्या कारणांविषयी विचार करू आणि प्रत्येक कारणाचा अर्थ समजून घेऊ.

स्वीकार/स्वीकृती

स्वीकार हा गृहीत धरता येत नाही. स्वीकृती ही ज्ञानामधून येते. आम्ही स्वीकृतीचं महत्व समजावून सांगू आणि हे (स्वीकृतीचं) ज्ञान आपल्या लैंगिक प्राधान्याला कसे लागू पडते, हे बघू.

थोडी विश्रांती घ्या/नवीन काहीतरी शिकूया

वेळेच्या व्यवस्थापनाचे प्रश्न, वरचेवर डोकेदुखी, कामातील तणाव, किंवा मुलांबद्दलच्या कल्पनाविश्वात सारखे रमणे, अशा गोष्टींनी आपण अगदी भंडावून जाऊ शकतो, किंवा विस्कटून गेल्यासारखे होऊ शकते. म्हणून आपण रोजच्या जीवनातील आव्हाने सहजपणे पेलण्यासाठी ताणरहित होण्याचे तंत्र कोणते, हेही बघू या.

दिवास्वप्ने कल्पना आणि वर्तन

आम्ही कल्पना आणि वर्तन ह्या दोघांमधील वेगळेपणाचे महत्व समजावून सांगू. आपल्या स्वत:च्या लैंगिक कल्पना आणि स्वत:चे वर्तन यांबद्दल सखोल माहिती घेऊन लैंगिक वासनांशी संबधित आवेगावरचे नियंत्रण आपण सुधारू शकू.

स्वतःबद्दलची समज

आपण स्वत:वर आणि आपल्या आंतरिक प्रक्रियांवर जवळून नजर टाकू. उद्देश असा की, अयोग्य लैंगिक वर्तन आणि संभाव्य धोकादायक परिस्थिती ओळखता येणे, आणि विचार व भावनांना शिस्त लावून सुरुवातीलाच योग्य पावले उचलणे.

व्यक्तिगत पातळीवर उद्युक्त करणारे घटक

लैंगिक शोषण करण्याचा किंवा बाल लैंगिक चित्रफिती वापरण्याचा धोका नेहमी एकसारखा असतो असे नाही, तर काही विशिष्ट परिस्थितींनुरूप कमी-जास्त होतो. कल्पनांवर कृती करण्याचा धोका ज्यांच्यामुळे वाढतो, असे “ट्रिगर्स” ओळखायला आपण शिकू.

परिस्थितीचे विश्लेषण

मुलांच्या लैंगिक चित्रफिती पाहण्याच्या किंवा लैंगिक शोषणाच्या - आधी, घडताना, किंवा घडून गेल्यानंतर - काय-काय होते, ह्याचे आम्ही परीक्षण करू.

आवेगांवर नियंत्रण

डायेट करताना ... दोन-दोन.. किंवा तीन-तीन चॉकलेट? कधी-कधी आपल्या आवेगावर नियंत्रण ठेवणे खूपच जड जाते. आता इथे आपण आवेग नियंत्रण करण्याचे महत्व जाणून रोजच्या आयुष्यातील हे नियंत्रण सुधारण्याचे उपाय शोधू या.

तदनुभूती

आपण आनंद किंवा दु:ख काहीही पाहत असलो, तरी माणूसकीच्या अनुभवातून आपण दुसऱ्याच्या चष्म्यातून त्याचे जग बघू शकतो. दुसऱ्यांच्या भूमिकेत शिरून तसा अनुभव घेण्याच्या आपल्या क्षमतेवर आपण जवळून नजर टाकू आणि ही क्षमता आपल्या सभोवतालच्या सामाजिक परिस्थितीत वावरायला कशी उपकारक ठरते ते आपण पाहू या.

एका पीडितेचे पत्र

बाल लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या मुलांच्या भावनिक आणि शारीरिक स्वास्थ्यावर लैंगिक शोषणाचा अत्यंत गंभीर आणि नाट्यपूर्ण परिणाम होतो. इथे आपण एका बाल लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या पिडीताचे अनुभव व परिणाम पत्राद्वारे मांडले आहेत ते जाणून घेऊया.

वैद्यकीय उपचारांचा पर्याय

काही लोकांच्या मनात लैंगिक इच्छा किंवा त्याबद्दलच्या कल्पना खूप प्रखर असतात, अनावर होतात, आणि त्यामुळे अशा लोकांना खूप क्लेश होतात. अशा लोकांसाठी औषध घेणे हा एक मौल्यवान आणि अतिरिक्त पर्याय आहे, ज्याची रूपरेषा आम्ही देऊ.

आरोग्यपूर्ण जीवनाचे रहस्य

एक चांगलं जीवन जगण्यासाठी, आपले स्वाथ्य चांगले टिकवून ठेवण्यासाठी आपण आपल्या व्यक्तिगत गरजांबाबत जाणीव आणि आदर ठेवायला हवा. म्हणून आम्ही थोडक्यात मार्गदर्शन करू आणि एका नवतरुणाची कथा वाचून त्याने त्याच्या नकारात्मक वर्तनावर समजून-उमजून कशी मात केली ते पाहू या.

Prof. Dr. med. Dr. phil. Klaus M. Beier Prof. Dr. med. Dr. phil. Klaus M. Beier

व्यक्तीनुरूप विविध प्रकारची लैंगिक प्राधान्ये हे मानवी लैंगिकतेचे वैशिष्ट्य आहे. प्रत्येक व्यक्तीच्या लैंगिक आवडी-निवडींमध्ये वेगळेपणा असतो. या कल्पना प्रथम मनात घोळण्याच्या रूपात अवतरतात, आणि नंतर त्याप्रमाणे वागून बघण्याचा आवेग उत्पन्न होतो. कोणत्याही प्रकारची लैंगिक प्राधान्ये ही आधीच ठरलेली असतात आणि त्यात निवडीला वाव नसतो; आपली स्वत:ची लैंगिक ओढ कोणीही निवडून ठरवू शकत नाही.

ज्याना लहान किंवा किशोरवयीन मुलांमुलींबद्दल लैंगिक आकर्षण वाटते आणि त्याविषयी त्यांना तज्ञ व्यक्तींशी प्रत्यक्ष संपर्काची संधी मिळत नाही, अशा व्यक्तींसाठी TROUBLED DESIRE (ट्रबल्ड डिझायर) ही एक इंटरनेटच्या मदतीने स्व-व्यवस्थापन देऊ करणारी यंत्रणा आहे. शक्य असल्यास तज्ञांशी संपर्क घडवून आणता येईल. स्व-व्यवस्थापन यंत्रणा व त्याचबरोबर तज्ञांबरोबर केलेल्या प्रत्यक्ष संपर्काबाबत गोपनीयता राखली जाईल आणि हे सर्व निनावी असेल (Privacy Policy).

ज्याना पिडोफिलीयाकडे कल असल्यामुळे खूप मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते त्यांचा त्रास कमी करायचा आणि अखेरीस बाल लैंगिक अत्याचाराला आणि बाल-लैंगिक चित्रफितींचा वापर करण्यास प्रतिबंध करायचा या गोष्टी आम्हाला तुमच्या सहकार्याने साध्य करायच्या आहेत.

Disclaimer

दिलेले प्रश्न फक्त ऑनलाईन पद्धतीने करायच्या वापरकर्त्याच्या वैद्यकीय विश्लेषणासाठीच आहेत आणि त्यांचा गैरवापर करू नये किंवा चुकीचा अर्थ लावला जाऊ नये. या वेबसाईटवरील माहिती ही केवळ त्या त्या माणसाच्या व्यक्तिगत आणि अ-व्यावसायिक वापरासाठी आहे, आणि ती व्यक्ती या माहितीच्या वापरासाठी पूर्ण जबाबदार असेल. या वेबसाईटचा हेतू हा भावनिकदृष्ट्या व्यथित असलेल्या माणसांची कायदेशीर परिस्थिती काहीही असली तरी त्यांना किमान वैद्यकीय/मानसिक मदत मिळावी, असा आहे.

या वेबसाईटवर असणाऱ्या मजकूर/आशयाची संपूर्ण जबाबदारी शॅरीते युनिव्हर्सिटी क्लिनिक, बर्लिन, जर्मनी येथील इन्स्टिट्यूट ऑफ सेक्सोलोजी आणि सेक्शुअल मेडिसिनची राहील आणि भागीदारी असणाऱ्या इतर कुठल्याही संस्था याला जबाबदार राहणार नाहीत. काही प्रश्न असल्यास कृपया info@troubled-desire.com इथं संपर्क करा.

ह्या वेबसाईटचा वापर करतानाच हे गृहीत आहे की वापरकर्ता हा स्थानिक कायद्यांनुसार आमच्या सेवा घेण्यासाठी वयाच्या दृष्टीने पात्र असून तो आपल्या जबाबदारीवर वेबसाईट वापरण्याची हमी घेत आहे.

सर्व विवाद केवळ पुणे न्यायाधिकरणाच्या कक्षेमध्ये असतील.